पोस्ट्स

गुरुसंदेश 09/10/2024

गुरुसंदेश एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. या जगात कुठलेही गोष्ट एकदा नाही दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा मोबाईल एकदा नाही तर दोनदा तयार झालाय.पहिल्यांदा बनवण्याऱ्याच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात.तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे ना. अगोदर तुम्हाला मनात बनायला लागेल प्रत्यक्षात येईल.याला एकरूप होणं म्हणतात.आमचे जगतगुरू तुकाराम महाराच म्हणतात. देव पाहाया गेलो देवची होवोनी आलो.जाईपर्यंत मी भक्त आहे. पण एकदा त्याच्याजवळ पोचलो. मीच देव झालो. ही एकरूपता आहे.आमल्या ध्येयाशी एकरूप असणे म्हणजे ध्येय मिळवणे. श्री स्वामी समर्थ.

गुरुसंदेश 08/02/24

गुरुसंदेश वर्गात गुरुजी घरी दिलेला गृहपाठ तपासत होते. एका मुलाला उभा केला. तो म्हणाला वही आणली नाही गुरुजी. उभा राहा. हात पुढे कर. आणि गुरुजी त्याच्या हातावर छडी मारणार. तोच त्याच लक्ष त्याच्या हाताकडे गेले. आणि उगारलेली छडी माघार घेत त्या मुलाच्या हाताकडे बघत म्हणले. तुला छडी मारून तरी काय उपयोग. तूझ्या हातावर विद्येची रेशच नाही. त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं. त्यानं गुरुजीला विचारलं. हातावर विद्येची रेष कुठे असते. गुरुजीने ती जागा दाखवली, आणि क्षणात तो मुलगा वर्गाच्या बाहेर पडला. काही क्षणात तो परत आला. तेव्हा त्याचा हात रक्ताळेला होता. गुरुजीने विचारले, हे काय केलेस. तेव्हा तो बोलला. गुरुजी नियतीने माझ्या हातावर विद्येची रेष बनवली नाही. ती रेष माझ्या हातावर चाकूने बनवून आलोय. मी विद्या मिळवणार गुरुजी. हाच स्वतःच्या हातावर चाकूने विद्येची रेष कोरणारा मुलगा व्याकरणाचार्य बाणिनि म्हणून प्रसिद्धीस आला. तुम्ही कोण आहात यालाच काहीच महत्व नाही. तुमचा निश्चयच तुम्ही कोण होणार आहात हे ठरवत असतो. सारेच गुण साऱ्यात असतील असे अजिबात नाही. पण कुणात काहीच नाही असे कधीच होत नाही. श्री स्वामी समर्...