गुरुसंदेश 08/02/24
गुरुसंदेश
वर्गात गुरुजी घरी दिलेला गृहपाठ तपासत होते. एका मुलाला उभा केला. तो म्हणाला वही आणली नाही गुरुजी. उभा राहा. हात पुढे कर. आणि गुरुजी त्याच्या हातावर छडी मारणार. तोच त्याच लक्ष त्याच्या हाताकडे गेले. आणि उगारलेली छडी माघार घेत त्या मुलाच्या हाताकडे बघत म्हणले. तुला छडी मारून तरी काय उपयोग. तूझ्या हातावर विद्येची रेशच नाही. त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं. त्यानं गुरुजीला विचारलं. हातावर विद्येची रेष कुठे असते. गुरुजीने ती जागा दाखवली, आणि क्षणात तो मुलगा वर्गाच्या बाहेर पडला.
काही क्षणात तो परत आला. तेव्हा त्याचा हात रक्ताळेला होता. गुरुजीने विचारले, हे काय केलेस. तेव्हा तो बोलला. गुरुजी नियतीने माझ्या हातावर विद्येची रेष बनवली नाही. ती रेष माझ्या हातावर चाकूने बनवून आलोय. मी विद्या मिळवणार गुरुजी. हाच स्वतःच्या हातावर चाकूने विद्येची रेष कोरणारा मुलगा व्याकरणाचार्य बाणिनि म्हणून प्रसिद्धीस आला.
तुम्ही कोण आहात यालाच काहीच महत्व नाही. तुमचा निश्चयच तुम्ही कोण होणार आहात हे ठरवत असतो. सारेच गुण साऱ्यात असतील असे अजिबात नाही. पण कुणात काहीच नाही असे कधीच होत नाही.
श्री स्वामी समर्थ
शुभ सकाळ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा